शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक, दोघे ठार; पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरणजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:52 IST

दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करून सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले

रेठरे धरण : पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरण (ता. वाळवा) तलावाच्या उतारावर दुचाकीने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिराळा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. या अपघातात पवन सुरेश कदम (वय २५, रा. कदमवाडी, ता. शिराळा) व अभिषेक अमर परदेशी (वय २४, रा. शिराळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री पेठकडून शिराळाच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १० ईएस ९४४०) वेगात निघालेले हे दोघे युवक रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तलावाजवळ आल्यावर शिराळाकडे चाललेल्या उसाच्या ट्रॉलीला (एमएच ०९ ईव्ही ९४३०) पाठीमागील बाजूस जोरात धडकले.या अपघातात दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात रात्री उशिरा झाल्याने घटनास्थळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली असून, रात्री उशिरा दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करून सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.त्याच मार्गावर आणखी एक अपघातत्याच पेठ शिराळा मार्गावर बुधवारी रात्री नऊ वाजता आणखी एक अपघात घडला. पेठ शाळेजवळ शिराळाकडे दुचाकीवरून सूरज भीमराव घेवदे (वय २५, रा. रेठरे धरण) निघाले होते. त्यांना दुसऱ्या दुचाकीने डॅश देऊन ती पुढे निघून गेली. दुसऱ्या दुचाकीने दिलेल्या धक्क्यामुळे सूरज दुचाकीवरून रस्त्यावर पडले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चाक सूरज यांच्या पायावरून गेले. या अपघातात सूरज गंभीर जखमी झाले असून ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या अपघाताबाबत पोलिसांमध्ये अद्याप नोंद झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Two Killed as Bike Hits Sugarcane Tractor Trolley

Web Summary : Two young men died in a tragic accident near Rethare Dam in Sangli after their motorcycle rammed into a sugarcane tractor trolley. In a separate incident on the same road, another person was seriously injured after being hit by a truck.