शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

सांगलीतून दोनशे एसटी कर्मचारी बेस्टच्या सेवेसाठी पुन्हा मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:04 IST

CoronaVirusUnlock, MumbiBest, StateTransort, Sangli मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, मात्र त्यातील शंभरावर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने गहजब निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसांगलीतून दोनशे एसटी कर्मचारी बेस्टच्या सेवेसाठी पुन्हा मुंबईला २३ डिसेंबरपर्यंत काम करणार, कोरोनामुळे ५५ वर्षांखालील कर्मचार्यांचीच नियुक्ती

सांगली : मुंबईतबेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, मात्र त्यातील शंभरावर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने गहजब निर्माण झाला होता.मुंबईत लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नाही. त्याचा मोठा ताण बेस्ट प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून एसटी गाड्या व कर्मचाऱ्यांची मागणी बेस्टने केली आहे. त्याला प्रतिसाद देत सांगली, पुणे, जळगाव आणि नांदेड विभागातून एसटी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. २३ डिसेंबरपर्यंत ते मुंबईत सेवा देतील.

गेल्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था न झाल्याने बराच दंगा झाला होता. आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लॉज उपलब्ध केले आहेत. जेवणाची जबाबदारी बेस्ट किंवा एसटीने घेतलेली नाही, त्याऐवजी दररोजच्या दोनवेळच्या जेवणासाठी २२५ रुपयांचा भत्ता दिला आहे.सांगली जिल्ह्यातून रविवारी (दि. ६) १०० चालक, १०० वाहक व सहा पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईत प्रतिक्षानगर आगारात काम करतील. सांगली आगारातून ४०, मिरजेतून ४० व अन्य आगारांतून १२० असे २०० चालक-वाहक गेले आहेत. सोमवारी (दि. ७ ) पहाटे पाच वाजल्यापासून त्यांची ड्युटी सुरु होईल.कोरोनाच्या सावटाखाली काम करणारगेल्यावेळी मुंबईत सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे या खेपेस काळजी घेतली आहे. ५५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांनाच पाठविले आहे, शिवाय ते निर्व्यसनी असतील याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. राहण्यासाठी हॉलऐवजी लॉजमध्ये स्वतंत्र खोल्या दिल्या असून जेवणाची निवड कर्मचाऱ्यांवरच सोपविली आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईBESTबेस्टSangliसांगली