शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

सांगलीमध्ये दोनशे रूपयांच्या बनावट नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:39 AM

सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे

ठळक मुद्देभाजी विके्रत्यांना गंडा : सुरक्षा धागा नसलेल्या नोटा आठवडा बाजारात खपविल्या; पोलिसांत तक्रार नाही

सांगली : सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

संजयनगर येथे आठवड्याचा बाजार बुधवारी भरत असतो. नेहमीप्रमाणे बुधवारी बाजार भरला होता. रात्री ९ च्या सुमारास एक अनोळखी ग्राहक आला आणि त्याने येथील बाजारात भाजी विक्रेत्या शालन शेळके यांच्याकडून अर्धा किलो वांगी घेतली व त्यांना दोनशे रूपयांची बनावट नोट दिली. त्याच ग्राहकाने सोनाबाई कोळपे यांच्यासह सुमारे आठ विक्रेत्यांना अशाचप्रकारे बनावट नोटा दिल्या. बाजारात ग्राहकांची गर्दी असल्याने विके्रत्यांनी घाईगडबडीत नोटा तशाच स्वीकारल्या. रात्री उशिरा बाजार संपल्यावर हिशेब करताना भाजी विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या नोटेबद्दल शंका वाटली.

काही जाणकार लोकांना या नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे दिसून आले. या नोटांमधील हिरव्या व निळ्या रंगात बदलणारा सुरक्षा धागा अस्तित्वात नव्हता. दोनशे रुपयांच्या आकड्यामागे चक्र दिसत नव्हते. हुबेहूब दिसणाºया या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई झाली असल्याचीही शक्यता आहे. यामागे एखादी मोठी टोळी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांच्या घटना उजेडात आल्या आहेत.बनावट नोटाप्रकरणी कारवाई करणार : बोराटेसांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विके्रत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. याबाबत विक्रेत्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने चौकशी करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सांगितले.सुरक्षेचा प्रश्न गंभीरसंजयनगर येथील आठवडा बाजारात पाकीट मारणे, महिलांची छेडछाड करणे असे प्रकारही घडत आहेत. आता बनावट नोटांचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वचदृष्टीने येथील बाजार असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली.

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी