खोतवाडी पुलासाठी पावणे दोन कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:41+5:302021-07-07T04:32:41+5:30
सांगली : निमणी नागाव, खोतवाडी, बिसूर, बुधगाव या रस्त्यावरील खोतवाडीच्या ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी १ कोटी ७५ लाखाचा निधी सार्वजनिक ...

खोतवाडी पुलासाठी पावणे दोन कोटी मंजूर
सांगली : निमणी नागाव, खोतवाडी, बिसूर, बुधगाव या रस्त्यावरील खोतवाडीच्या ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी १ कोटी ७५ लाखाचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केला. हा प्रस्ताव आता नाबार्डकडे जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हा रस्ता खोतवाडीच्या ओढा पात्रातून जातो. ओढ्याला पूर आल्यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. संपूर्ण पावसाळ्यातच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या गावांचा संपर्क तुटतो. सांगली शहराशीही त्यांचा संबंध तुटतो. त्यामुळे या पुलाचे काम होणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्याकरिता नाबार्डच्या योजनेअंतर्गत निधी मंजूर करावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांच्याकडे पृथ्वीराज पाटील यांनी केली होती. हा प्रस्ताव आता नाबार्डकडूनही लवकरच मंजूर होईल असे पाटील यांनी सांगितले.