मिरज पंचायतीचे दोघे कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:39+5:302020-12-09T04:22:39+5:30

सांगली : मनरेगाअंतर्गत गोठ्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या मिरज पंचायत समितीतील दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ...

Two contract employees of Miraj Panchayat | मिरज पंचायतीचे दोघे कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

मिरज पंचायतीचे दोघे कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

सांगली : मनरेगाअंतर्गत गोठ्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या मिरज पंचायत समितीतील दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिले. अन्य तालुक्यातील अधिकाऱ्यांनीही फायली त्वरित मार्गी न लावल्यास कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

मनरेगातील कामांत सावळागोंधळ असल्याच्या तक्रारी अध्यक्षांकडे आल्या होत्या. त्यामुळे सर्व तालुक्यांचे सभापती, गटविकास अधिकारी व लाभार्थ्यांची बैठक मंगळवारी अध्यक्षांच्या दालनात झाली. बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, कवठेमहांकाळचे सभापती चंद्रकांत हाक्के, मिरजेच्या सभापती सुनीता पाटील, मनरेगाच्या गटविकास अधिकारी साधना पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मनरेगाअंतर्गत गोठे, विहिरी आदी कामांतील दिरंगाईबद्दल अध्यक्षा कोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनरेगामधून २६२ प्रकारची कामे देता येतात, पण मोजक्याच प्रकारच्या कामांवर प्रशासनाने भर देणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.

अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याबद्दल लाभार्थींनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. कोरे म्हणाल्या की, प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक कामे करावीत. प्रत्येक तालुक्यांना समन्यायी पद्धतीने कामांना मंजुरी मिळावी.

चौकट

प्रत्येक शाळेत शौचालय, क्रीडांगण

जिल्ह्यातील मुलांच्या ५१ शाळा व मुलींच्या ३७ शाळांत शौचालये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छ भारत अभियानातून तेथे पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी दोन अशी एकूण चार शौचालये बांधण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यासाठी प्रत्येक शाळेला २ लाख १० हजार रुपये देण्याचे ठरले. मनरेगामधून शाळेला संरक्षक भिंती व मैदान सपाटीकरणाची कामेही करण्याचे ठरले.

चौकट

जतला ४००, तर आटपाडीला चारच

मनरेगाअंतर्गत गोठ्यांचे लाभ अत्यंत विस्कळीत दिल्याचे कोरे यांच्या निदर्शनास आले. जतला ४०० हून अधिक प्रस्ताव मंजूर असताना, कवठेमहांकाळ, आटपाडीला फक्त चारच गोठ्यांना मंजुरी मिळाल्याचे निदर्शनास आले.

चौकट

मिरजेतील दोघांना घरी पाठविले

मिरज पंचायतीच्या मनरेगा शाखेत एक कनिष्ठ सहायक व एक अभियंता अशा दोघा कर्मचाऱ्यांवर गोठ्याचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश कोरे यांनी दिले.

-------

--

Web Title: Two contract employees of Miraj Panchayat