शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 17:28 IST

समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ढालगाव : विजयपूर-गुहागर मार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारींमधील चौघे जखमी झाले. हा अपघात मंगळवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. जखमींमध्ये इस्लामपूरचे गावकामगार तलाठी निखिल पाटील व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.इस्लामपूरचे तलाठी निखिल पाटील हे पत्नीसह मोटारीतून (क्र. एमएच १० सीएक्स ९४३४) उटगी (ता. जत) येथे निघाले होते. महामार्गावर नागजजवळील गायकवाड वस्तीजवळ समोरून आलेल्या मोटारीच्या (क्र. एमएच १० एएन ०७८६) चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात पाटील यांच्यासह त्यांची पत्नी तसेच दुसऱ्या मोटारीतील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात निखिल पाटील यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे.समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात पाटील यांच्या मोटारीचा चक्काचूर झाला आहे, तर दुसऱ्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात