इस्लामपुरात घरबांधकामाच्या कारणातून दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:30 IST2021-09-22T04:30:07+5:302021-09-22T04:30:07+5:30
इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील शिवाजी चौकात घर बांधकामाच्या कारणातून लोखंडी सळीने दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. हा ...

इस्लामपुरात घरबांधकामाच्या कारणातून दोघांना मारहाण
इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील शिवाजी चौकात घर बांधकामाच्या कारणातून लोखंडी सळीने दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ९च्या सुमारास घडला.
याबाबत सुशील एकनाथ पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर जनार्दन पाटील व जनार्दन रंगराव पाटील या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारहाणीत सुशील पाटील आणि त्यांची भावजय माधवी पाटील जखमी झाल्या आहेत. सुशील पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. वरील दोघा संशयितांनी हे बांधकाम थांबविले होते. ते का थांबविले आहे, अशी विचारणा सुशील पाटील यांनी केली. त्या रागात दोघांनी लोखंडी सळीने मारहाण करून त्यांना जखमी केले, तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या माधवी पाटील यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.