तरुणाच्या लुटमारप्रकरणातील मुख्य संशयितासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:35+5:302021-04-23T04:29:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील योगेश जगन्नाथ वाघमारे (वय २९) या तरुणास प्लाॅट दाखविण्याचा बहाणा ...

Two arrested with the main suspect in the youth robbery case | तरुणाच्या लुटमारप्रकरणातील मुख्य संशयितासह दोघांना अटक

तरुणाच्या लुटमारप्रकरणातील मुख्य संशयितासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील योगेश जगन्नाथ वाघमारे (वय २९) या तरुणास प्लाॅट दाखविण्याचा बहाणा करून लुटमार केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी मुख्य संशयितासह दोघांना गुरुवारी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून गुन्ह्यातील कोयता आणि ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.

कुपवाड पोलिसांकडून अटक केलेल्या संशयितामध्ये मुख्य संशयित चंद्रकांत जगन्नाथ मंडले (वय २९, रा. सावळज, ता. तासगाव) व त्याचा साथीदार शुभम सुनील भंडारे (वय २१, रा. कवलापूर, ता. मिरज) यांचा समावेश आहे. फिर्यादी योगेश वाघमारे यांना मुख्य संशयित चंद्रकांत मंडले याने रविवार, दि. १८ रोजी सकाळी फोन करून प्लाॅट दाखवतो, असे सांगून कुपवाड- मिरज रस्त्यालगत असलेल्या एका काॅलनीसमोरील मोकळ्या जागेत बोलावले होते.

त्यावेळी मंडले व संजय पाटील, विनीत कांबळे, शुभम भंडारे यांनी कोयता, एअरगनचा धाक दाखवून त्यांची लुटमार केली होती. यातील संशयित संजय पाटील, विनीत कांबळे या दोघांना सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

त्यानंतर कुपवाड पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता या प्रकरणातील मुख्य संशयित मंडले व भंडारे यांच्या नावाची कबुली त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना सावळज (ता. तासगाव) येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ (एम.एच.-०५ ए.बी.-७८७८) आणि कोयता जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली एअरगन संशयितांनी सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील तलावात टाकली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, सहायक पोलीस फौजदार युवराज पाटील, सतीश माने, इंद्रजित चेळकर, विजय घस्ते, शिवाजी ठोकळ यांनी भाग घेतला होता.

Web Title: Two arrested with the main suspect in the youth robbery case