खुनी हल्ल्याप्रकरणी सच्या टारझनसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:03+5:302021-03-18T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिरगाव (ता. वाळवा) येथे संदेश उर्फ साहिल कदम याच्यावर कोयत्याने केलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी ...

खुनी हल्ल्याप्रकरणी सच्या टारझनसह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिरगाव (ता. वाळवा) येथे संदेश उर्फ साहिल कदम याच्यावर कोयत्याने केलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सचिन उर्फ टारझन सुभाष चव्हाण (वय २८) व रोहन हणमंत मुळीक (वय २३, दोघेही रा. वाळवा) अशी संशयिताची नावे आहेत. पसार होण्याच्या तयारीत असताना पडवळवाडी फाटा येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
संशयित रोहनचा भाऊ रजनीश हणमंत मुळीक ऊर्फ चन्या याचा २०१८मध्ये खून झाला होता. यात फिर्यादी संदेश कदम संशयित होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तो संशयितास शिवीगाळ करत दमदाटी करत होता. याचा राग मनात धरून त्यांनी संदेशवर खुनी हल्ला केला होता. तेव्हापासून तो पसार होतो.
गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पथक तयार केले होते. पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार पडवळवाडी फाटा येथे पळून जाण्यासाठी दोन तरुण थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी शिरगाव येथे नदीजवळ संदेश कदम याच्यावर कोयत्याने हल्ला आम्हीच केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.