शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

sangli crime news: पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:47 IST

न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथील आप्पासाहेब आण्णाप्पा मल्लाड यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सचिन रुद्राप्पा बळोळी (वय ३६ ) शिवानंद मल्लकाप्पा जनवाड (१९, दोघे रा ऐगळी,ता अथणी) याला पोलिसांनी तिकोटा (जि.विजापूर) येथे पकडले. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.पूर्व भागातील दरीबडची डाळिंब बागायतदार आप्पासाहेब मल्लाड यांचा मुलगी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने शुक्रवारी रात्री खून केला होता. मयत आप्पासो मलाड यांची मुलगी तेजश्री हिचा विवाह सचिन बळळ्ळो याच्याशी २०१९ मध्ये झाला होता. लग्नानंतर महिनाभरातच  पती-पत्नी, सासूमध्ये वाद होऊ लागला. वादामुळे तेजश्री ही माहेरी  राहण्यासाठी आली होती.  जावई सचिन यांनी पत्नीला नांदवण्यास पाठविण्यासाठी अथणी (जि.बेळगाव) न्यायालयातून नोटीस पाठविले होते. जत दिवाणी न्यायालयात तेजश्री हिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता.गेल्या महिनाभरापासून फोनवरुन जावई बघून घेण्याची, जीवे मारण्याची धमकी देत होता. शुक्रवारी रात्री सिचन रुद्राप्पा बळोळी, भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी, शिवानंद मल्लकाप्पा जनवाड यांनी पाळत ठेवून सासरे आप्पासाहेब यांचा खून केला. पोलिसांनी तातडीने शनिवारी मध्यरात्री ऐगळी येथे धाड टाकून मिलन बळोळी याला अटक केली.मिलन बळोळी याला १८ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.मुख्य आरोपी सचिन बळोळी पोलिसांना पाहून पळून गेला. त्यांचा शोध पोलिस पथकाकडून घेतला जात होता. पोलिसांना तिकोटा (जि विजापूर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून सचिन बळोळी व शिवानंद जानवाड या दोघांना अटक केली. त्यांना जत न्यायालयात हजर केले असता २० जानेवारी पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस