शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील दागिने चोरीप्रकरणी दोघींना सोलापुरात अटक, अडीच लाखांवर दागिने जप्त 

By अशोक डोंबाळे | Updated: March 25, 2024 18:35 IST

इस्लामपूर, विटा येथील गुन्ह्यांची कबुली

इस्लामपूर : शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्व्हर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख (६२) आणि नाजीया वसीम शेख (३३, दोघी रा. नयी जिंदगी, अमन चौक, सोलापूर) या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी त्यांच्याकडील दोन लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी यावेळी या दोघींनी विटा पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीचा छडाही लावला. या दोघींची अधिक तपासासाठी विटा पोलिसांकडे रवानगी केली आहे.२२ मार्चच्या दुपारी या दोघींनी गांधी चौकातील प्रतापचंद हुकमीचंद कोठारी यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने तेथील काउंटरवरील दागिने दाखवत असताना या हातचलाखीने १५ आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची प्रत्येकी एक बांगडी आणि साडेसात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण चोरून पोबारा केला होता. ही बाब लक्षात येताच कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.त्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोलापूर येथे जाऊन या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी इस्लामपूर आणि विटा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.या कारवाईत सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सागर गायकवाड, हवालदार दीपक ठोंबरे, आलमगीर लतीफ, सतीश खोत, वर्षा मिरजकर, पूनम खोत व सायबरचे कॅप्टन गुंडेवार यांनी भाग घेतला. सागर गायकवाड अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस