शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन मोबाईल मागवायचे, अन् डिलीव्हरी बॉयची फसवणूक करायचे; सांगलीत दोघे जेरबंद

By शरद जाधव | Updated: April 12, 2023 18:53 IST

आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, बॉक्समधून मोबाईल काढून साबणाच्या वड्या ठेवत 

सांगली : ऑनलाईन शॉपिंगव्दारे माेबाईल मागवून डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून घेत फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. महंमद उर्फ जॉर्डन युसूफ इराणी (वय २९) व उम्मत युसूफ इराणी (२९, दोघेही रा. ख्वॉजा कॉलनी, सह्याद्रीनगर,सांगली) असे संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून १४ मोबाईलसह दुचाकी असा आठ लाख दोन हजार २१७ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.ऑनलाईन कंपनीला मोबाईलची ऑर्डर देवून ती देण्यासाठी येणाऱ्या डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून घेत त्याऐवजी साबणाच्या वड्या देत फसवणूकीचे करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पाश्व'भूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी खास पथकाव्दारे या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, शहरातील भारत सुतगिरणी चौक येथे संशयित दोघे येणार आहेत. त्यानुसार छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गुन्ह्याची कबुली दिली.अशाप्रकारे १४ मोबाईल त्यांनी हातचलाखी करून काढून घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास पवार, नागेश खरात, हेमंत ओमासे, कुबेर खोत, सागर लवटे, दीपक गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.बॉक्समधून मोबाईल काढून साबणाच्या वड्या ठेवत ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना मोबाईलची ऑर्डर देवून मोबाईल घेऊन डिलीव्हरी बॉय आल्यानंतर त्यााला बोलण्यात गुंतवून त्यातील एकजण बाजूला जावून मोबाईल काढून घेत असे व त्याऐवजी साबणाच्या वड्या ठेवत असे. त्यानंतर पैसे नसल्याचे कारण देत अथवा इतर कारण सांगून तो बॉक्स परत दिला जात होता. यातून मिळालेल्या मोबाईलची ते विक्री करत हाेते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस