आष्ट्यात तलवार, चाकू तस्करी प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:52+5:302021-04-07T04:27:52+5:30

: आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई यांच्यासह पोलिसांनी तलवार व चाकू घेऊन ...

Two arrested in Ashtyat sword, knife smuggling case | आष्ट्यात तलवार, चाकू तस्करी प्रकरणी दोघांना अटक

आष्ट्यात तलवार, चाकू तस्करी प्रकरणी दोघांना अटक

: आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई यांच्यासह पोलिसांनी तलवार व चाकू घेऊन जाणाऱ्या प्रथमेश पाटील, सुरज चौगुले या दोघांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा पोलिसांनी बागणीजवळ काकाचीवाडी बावची फाट्यावर रात्रीची गस्त घालत असताना मोटारसायकलस्वाराकडून दोन तलवारीसह चार लोखंडी सुरे व मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी प्रथमेश संजय पाटील (२२, रा. गोटखिंडी) व सूरज शंकर चौगुले (२४ रा. लोणारवाडी, गाताडवाडी) याला अटक करण्यात आली.

आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश संजय पाटील व सूरज शंकर चौगुले हे दोघेजण बेकायदेशीररीत्या शस्त्रांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टा पोलिसांनी सापळा रचला. बागणी नजीक बावची फाटा येथे मोटारसायकल (एमएच १० सीपी ५३६२) वरून तलवारी व सुरे घेऊन दोघेजण निघाल्याची माहिती अभिजीत धनगर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई, हवालदार अभिजीत धनगर, राजकुमार जंगम, नितीन पाटील, अमोल शिंदे, संजय सनदी, अभिजीत नायकवडी, सुरज थोरात व सहकारी रात्रीची गस्त घालत असताना त्यांना दोघेजण बेकायदेशीररीत्या शस्त्रांची वाहतूक करताना सापडले. त्यांच्याकडून दोन तलवारी, चार सुरे यासह मोटरसायकल असा ३२ हजार २०० रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद करत आहेत.

Web Title: Two arrested in Ashtyat sword, knife smuggling case