शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अतिघाई ठरतेय जीवघेणी ; अडीच कोटीचा दंड, तरीही बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:25 IST

वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई : नियम मोडल्याने वाढली जिल्ह्यातील अपघातांची शक्यता

शरद जाधव ।सांगली : रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने ओव्हरटेक करणे, तसेच शहरातील प्रमुख मार्गावर सिग्नल असतानाही त्याचे पालन न करता सिग्नल तोडण्याची वाहनधारकांची मानसिकताच जीवघेणी ठरत आहे. वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

जिल्ह्यातून तीन राष्टÑीय महामार्ग, दोन आंतरराज्य मार्ग, तर ११ राज्यमार्ग जातात. यातील रस्त्यांची स्थितीही यथातथाच आहे. त्यात बहुतांश मार्गांचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना सावकाशपणे वाहन चालवावे लागते. या मार्गावर अती वेगाने वाहन चालविणाºयावर कारवाई होण्याबरोबरच सेवा मार्गाचा वापर टाळणे, वेगमर्यादा न सांभाळणे यासह इतर कारणांनी अपघाताची शक्यता वाढत असते. पण याच्या उलट परिस्थिती शहरात आहे. शहरातील प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने सर्रास वाहतूक नियम मोडले जातात. विशेषत: सिग्नल तोडण्यात वाहनचालक अग्रभागी आहेत. तरुणांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच धोकादायकरितीने ओव्हरटेक केले जात असल्यानेही अपघात होत आहेत.

यावर पर्याय म्हणून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगली व मिरज शहरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्लास्टिकचे दुभाजक बसविण्यात आले आहेत, तर देशातील प्रमुख शहरात असलेली ‘लेफ्ट साईड फ्री’ संकल्पनाही राबविण्यात आली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. नव्यानेच बसविलेल्या सीसीटीव्हीमुळे थेट नियम मोडणाºया वाहनचालकाचा वाहन क्रमांक मिळत असल्याने, कारवाई सोपी होत आहे. असे असले तरी नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. शहरात सिग्नलचे सेकंद पूर्ण होण्याअगोदरच भरधावपणे वाहन पुढे रेटल्यानेही अपघात होत आहेत.‘स्पीड गन’ने टिपली : २९८५ भरधाव वाहनेअपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी व शहरातील वाहतूक नियोजनासाठी सांगलीतील वाहतूक शाखेकडे ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांत वेगमर्यादेचे पालन न करणाºया वाहनांवर ‘स्पीड गन’च्या माध्यमातून कारवाई केली जाते. केवळ तीन महिन्यात सांगली व मिरज शहरात भरधाव वाहने चालविणाºया २९८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही सांगली - मिरज रोड, सांगली-कोल्हापूर रोड, मिरज-पंढरपूर रोडवर सुसाट वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. 

अपघातामध्ये तरुण मुलांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन हातात देताना अगोदरच संभाव्य परिणाम सांगावेत. तरुण मुलांमध्ये वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलांवर लक्ष ठेवल्यास त्यांची ही सवय जाऊ शकते. महाविद्यालयीन स्तरावर मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे.- पूनम गायकवाड, समुपदेशकमहाविद्यालयीन स्तरावर एनएसएसच्या माध्यमातून मुलांना वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली जाते. शिवाय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडवून, अपघात, त्याचे परिणाम याबाबतही सजग केले जाते. तरीही वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी आपली जबाबदारी समजून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळण्यास मदत होणार आहे.- दिलीप कोथळे, प्राध्यापक

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी