शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २० दिग्गजांचा पत्ता कट, संभाव्य उमेदवारांची यादी...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:50 IST

अर्ज दाखल करण्याच्या सूचना

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीवर रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. दुपारनंतर संभाव्य उमेदवारांना भाजपकडून अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण, अधिकृत उमेदवार यादी मात्र जाहीर केली नाही. सोमवारी उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात येणार आहे. भाजपकडून अनेक माजी नगरसेवकांसह २० दिग्गजांचे पत्ते कापण्यात आले आहेत.भाजपने उमेदवार यादीबाबत सावध पवित्रा घेतला होता. त्यात उमेदवारी वाटपावरून भाजपअंतर्गत वाद उफाळून आला. पक्षात नव्याने आलेल्या जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांना जागा देताना निष्ठावंतावर अन्याय होणार नाही, याची दक्षता भाजपला घ्यावी लागत होती. त्यातून पक्षाअंतर्गत वाद टोकाला पोहोचला. उमेदवारीचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोर्टात पोहोचला. मुंबईतील बैठकीतही जोरदार वादावादी झाली. त्यात राष्ट्रवादीने (अजित पवार) सवतासुभा मांडल्याने भाजपची गणिते बिघडली होती.चार ते पाच दिवसांतील चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर भाजपने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या यादीतून अनेक माजी नगरसेवकांना धक्का देण्यात आला. त्यांचा पत्ता कट झाला आहे. तसेच भाजपमधील निष्ठावंत व दिग्गज कार्यकर्त्यांनाही उमेदवार देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहेत.

संभाव्य उमेदवार असे-प्रभाग एकमधून ऋषीकेश सूर्यवंशी, पद्मश्री पाटील, रवींद्र सदामते, प्रभाग दोनमधून प्रकाश ढंग, प्रदीप पाटील, प्रभाग आठमधून संजय पाटील, दीपक वायदंडे, प्रभाग नऊमधून संतोष पाटील, रोहिणी पाटील, अतुल माने, वर्षा सरगर, प्रभाग दहामधून जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, गीता पवार, प्रभाग अकरामधून मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, सविता संतोष रुपनर, प्रभाग बारामधून धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, प्रभाग चौदामधून अनिता हणमंत पवार, उदय बेलवलकर, मनीषा संदीप कुकडे, प्रभाग सोळामधून उत्तम साखळकर, स्वाती शिंदे, प्रदीप ऊर्फ गजू बन्ने, विद्याताई दानोळे, प्रभाग सतरामधून प्रशांत पाटील, गीतांजली ढोपे पाटील, लक्ष्मण नवलाई, मालन गडदे, प्रभाग अठरामधून शैलेश पवार, वैशाली राजू गवळी, बिस्मिला शेख, गाता जगदाळे, प्रभाग १९ मधून संजय कुलकर्णी, सविता मदने, अलका ऐवळे, कीर्ती देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

यांचा पत्ता कट?भाजपमधून अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. यात माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी गटनेते विनायक सिंहासने, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, अप्सरा वायदंडे, सोनाली सगरे, सुनंदा राऊत, भारती दिगडे, या माजी नगरसेवकांसह अमोल गवळी, पूजा खांडेकर, रौनक शहा, विश्वजित पाटील, सुजित काटे, सुजित राऊत, आशा शिंदे, नितीन शिंदे, दरिबा बंडगर, प्रतिभा दीपक माने या दिग्गजांचाही उमेदवार यादी समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काही जागांवर अद्यापही चर्चाप्रभाग १५ मधील चारही जागांवर भाजपमध्ये अजून खलबते सुरू आहेत. त्याशिवाय गावभागामधील दोन जागांवरही उमेदवारीचा पेच अडकला आहे. इतर प्रभागातील उमेदवारांची यादी मात्र भाजपने अंतिम केल्याचे सांगण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: BJP Drops 20 Veterans, Probable Candidates List

Web Summary : BJP finalized Sangli election candidates, dropping 20 veterans amid internal disputes. Probable candidates named; some seats still under discussion. Factionalism and candidate selection caused upheaval.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा