तिसंगीतील द्राक्षबाग कोसल्यामुळे बारा लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:36+5:302021-02-20T05:16:36+5:30

बुधवारी मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेला पाऊस दोन तास चालू होता. द्राक्षबागेसह रब्बी हंगामातील शाळूसह इतर पिकांचेही मोठे नुकसान ...

Twelve lakh loss due to collapse of vineyard in Tisangi | तिसंगीतील द्राक्षबाग कोसल्यामुळे बारा लाखांचे नुकसान

तिसंगीतील द्राक्षबाग कोसल्यामुळे बारा लाखांचे नुकसान

बुधवारी मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेला पाऊस दोन तास चालू होता. द्राक्षबागेसह रब्बी हंगामातील शाळूसह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. तिसंगी येथे अवकाळी पावसाने द्राक्षबाग कोसळल्याने भारत कदम यांनी अतिशय कष्टाने व लाखो रुपयांचे पीक कर्ज घेऊन ही बाग तयार केली होती. या द्राक्षबागेत विक्रीयोग्य असा द्राक्षमाल होता. १५२ रु. प्रति चारकिलो दराने सुमारे ३०० पेटी द्राक्ष विकली होती. परंतु अद्याप बराच माल बागेत शिल्लक होता. कदम यांच्या दीड एकर द्राक्ष बागेतील मालाचे सुमारे आठ ते दहा लाख व बाग उभारणीसाठीचे सुमारे दोन लाख रुपये इतके मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जी. गोरे व गावकमगार तलाठी रामू कोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामे केले. शासनाने नुकसानभरपाई व पीक कर्जापोटी पीक विमा द्यावा, अशी मागणी भारत कदम यांनी केली आहे.

Web Title: Twelve lakh loss due to collapse of vineyard in Tisangi