शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करंजेतील अग्रणी नदीपात्रात ट्रक उलटला : सुदैवाने चालक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 21:29 IST

पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला.

ठळक मुद्देट्रक जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अपघातात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले आहे.

विटा : तासगावहून आटपाडीकडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाणारा ट्रक, पाण्यात गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अग्रणी नदीपात्रात पलटी झाला. ही घटना गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करंजे (ता. खानापूर) येथे घडली. या अपघातात चालक दादासाहेब शंकर दोपटे (रा. जामखेड, जि. अहमदनगर) बचावले.

पुणे चाकण येथील बॉश कंपनीच्या गोदामामधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन आलेला ट्रक सातारा येथे माल उतरून सांगलीत आला. त्यावेळी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आटपाडी येथे पोहोच करायची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चालक दोपटे ट्रक घेऊन तासगाव, वायफळे, करंजे, भिवघाटमार्गे आटपाडीकडे जात होते. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रक करंजे गावानजीक वायफळे रस्त्यावर असलेल्या अग्रणी नदीजवळ आला. अग्रणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्ता तयार केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने पर्यायी रस्त्यावरही पाणी आले आहे.

पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. त्यावेळी तेथे असलेल्या स्थानिकांनी प्रसंगावधान राखून ट्रक चालकाला केबिनमधून बाहेर काढल्याने चालक बचावला. त्यानंतर नदीपात्रात पडलेला ट्रक जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. या अपघातात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.करंजे येथील अग्रणी नदीपात्रात चालकाला पर्यायी रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक नदीपात्रात पलटी झाला.

 

टॅग्स :AccidentअपघातriverनदीSangliसांगली