वाळवा फाट्यावर ट्रक-जीपचा अपघात, चौघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST2021-03-27T04:28:09+5:302021-03-27T04:28:09+5:30

आष्टा : पेठ-सांगली मार्गावर वाळवा फाट्यानजीक जीपने ट्रकला समोरून दिलेल्या धडकेत जीपमधील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ...

Truck-jeep accident on dry fork, four serious | वाळवा फाट्यावर ट्रक-जीपचा अपघात, चौघे गंभीर

वाळवा फाट्यावर ट्रक-जीपचा अपघात, चौघे गंभीर

आष्टा : पेठ-सांगली मार्गावर वाळवा फाट्यानजीक जीपने ट्रकला समोरून दिलेल्या धडकेत जीपमधील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडेतीनदरम्यान झाला. या अपघातात जीप पलटी झाल्याने तिचा चक्काचूर झाला.

पेठ-सांगली रस्त्यावर वाळवा फाट्यानजीक सांगलीहून इस्लामपूरच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (केए २२ सी १५२७) व सांगलीच्या दिशेने जाणारी जीप (एमएच १३ सी ९०४४) यांचा शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात जीप पलटी होऊन चक्काचूर झाला. जीपमधील चौघे गंभीर जखमी झाले. जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हवालदार शिवाजी काकतकर अधिक तपास करीत आहेत.

फोटो : पेठ-सांगली मार्गावर वाळवा फाटा येथे झालेल्या अपघातात जीपचा चक्काचूर झाला.

Web Title: Truck-jeep accident on dry fork, four serious