शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Sangli: ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:39 IST

विरूद्ध बाजूने येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला वाचवताना पुलाचा कटडा तोडून ट्रक तब्बल ५५ फुट खोल नदी पात्राच्या कडेला कोसळला

बोरगाव: ताकारी ता. वाळवा येथील राजारामबापू पुलावरून औषध निर्मितीचा कच्चा माल वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५५ फूट खाली नदी पात्राच्या कडेला कोसळला. यात चालक बाळासाहेब गुलाबराव देवकर (वय ५५ रा. कुपवाड) हे गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री १२.४० च्या सुमारास घडली. जखमी चालकाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब दरेकर हे सांगली येथून फार्मा कंपनीचे औषध निर्मितीचा कच्चा माल मुंबईकडे घेऊन निघाले होते. ताकारीच्या राजारामबापू पुलावर आले असता समोरून ऊसाचा ट्रॅक्टर भरधाव वेगाने विरूद्ध बाजूने येत होता. ट्रॅक्टरला वाचवताना अंधारात पुलाचा अंदाज न आल्याने पुलाचा कटडा तोडून ट्रक तब्बल ५५ फुट खोल नदी पात्राच्या कडेला कोसळला. यात ट्रक चालक दरेकर गंभीर जखमी झाले. गावातील तरूणांनी त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्रक मालक जयदत्त शिंदे यांनी दिली. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत. दैव बलवत्तर ट्रक तब्बल ५५ फूट नदी पात्राच्या कडेला लाल मातीत कोसळल्याने चालकाचा जीव वाचला. दहा फुट मागील बाजूस नदी पात्रात ट्रक कोसळला असता तर चालकाला जीव गमवावा लागला असता. मध्यरात्री नागरिक व तरूणांनी मदत करून तात्काळ चालकाला रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात