आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध

By हणमंत पाटील | Published: September 7, 2023 07:37 PM2023-09-07T19:37:58+5:302023-09-07T19:38:45+5:30

गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Tributes paid to MLA-MP in Atpadi, protest against the incident of lathi attack in Sarati | आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध

आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध

googlenewsNext

आटपाडी : येथे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी आटपाडीत मोर्चा काढण्यात आला. या वेळी खासदारांना व आमदारांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आटपाडी येथे आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मराठा मोर्चाने गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी आटपाडी बस स्थानक येथे मराठा समाज बांधव एकत्र आले होते.बसस्थानका पासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठे मार्गे मोर्चा बाजार पटांगण ते आटपाडी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आला.

यावेळी मोर्चाचे रुपांतर, बैठकीत झाले. या ठिकाणी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, अनिता पाटील,गौरीहर पवार, शरद पवार, प्रा. विजय शिंदे, बापूसाहेब गिड्डे, आनंदरावबापू पाटील, डी.एम. पाटील, अँड. धनंजय पाटील, सौरभ पाटील, बी.ए. पाटील, सादिक खाटिक, जितेंद्र जाधव, तानाजी नांगरे, पोपट पाटील, मनोज पाटील,महेश पाटील, संभाजी पाटील, अशोक देशमुख, विपुल कदम, अतुल यादव, मोहनभाऊ देशमुख, शिवाजीतात्या पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, तानाजी नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन...
यावेळी मराठा समाजाच्या वतीने मराठा व मराठा कुणबी असा भेदभाव न करता सर सकट मराठा समाजाला 16 टक्के ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजातील मागेल त्याला कुणबी जात प्रमाणपत्र देणेत यावे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाया भरघोस निधी देण्यात यावा.सारथी संस्थेस दोन हजार कोटी निधी द्यावा.प्रत्येक जिल्हयात मराठा समाजातील मुले व मुलींच्या साठी वसतिगृह ताबडतोब सुरू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाई माने यांना देण्यात आले.

Web Title: Tributes paid to MLA-MP in Atpadi, protest against the incident of lathi attack in Sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.