शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विटा शहरातील व्यवहार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 10:11 IST

माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. 

सांगली/विटा : माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे.  शनिवारी (10 मार्च) विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद ठेऊन पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी मंत्री डॉ. कदम यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात खानापूर तालुक्यातून झाली. सन 1968 ला एसटी महामंडळाचे सदस्य झाल्यानंतर विटा बसस्थानकाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते .

कडेगाव तालुक्याच्या निर्मितीपूर्वी विटा हे कदम यांच्या राजकीय वाटचालीचे ठिकाण होते. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणे व निकाल विटा मुख्यालयातच असल्याने यांचा खानापूर तालुक्याशी मोठा स्नेह होता. त्यामुळे डॉ. कदम यांच्या निधनानंतर आज शुक्रवारी विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  विटा शहर व खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीनेही पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगलीcongressकाँग्रेस