अरुण लाड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:41+5:302020-12-09T04:22:41+5:30

फोटो आहे...एडिटोरियलवर ०८ सांगली ०१ सांगली : राष्ट्रवादीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सांगलीचे माजी नगराध्यक्ष ...

Tribute to Arun Lad | अरुण लाड यांचा सत्कार

अरुण लाड यांचा सत्कार

फोटो आहे...एडिटोरियलवर ०८ सांगली ०१

सांगली : राष्ट्रवादीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सांगलीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्याहस्ते कुंडल येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सागर घोडके, युवानेते तौफिक शिकलगार, नीलेश घोडके, अमोल घोडके, सुहास सरग आदी उपस्थित होते.

---

सांगलीत अंशत: ढगाळ वातावरण

सांगली : जिल्ह्यातील तापमानात मंगळवारी वाढ झाली. दिवसभर जिल्ह्याच्या बहुतांश भागात अंशत: ढगाळ वातावरण होते. किमान तापमान १९, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सोमवारच्या तुलनेत किमान तापमानात ४, तर कमाल तापमानात २ अंशाने वाढ झाली. त्यामुळे थंडी घटली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवस अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची चिन्हे आहेत.

--

सांगलीत वाहतुकीची कोंडी

सांगली : वसंतदादा कारखाना परिसरातील संपत चौकात मंगळवारी सायंकाळी वाहतुकीची कोंडी झाली होती. संपत चौकापासून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची दाटी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या चौकात बेशिस्तपणे वाहनांची ये-जा सुरू असते. चौकात काही अतिक्रमणेही आहेत. त्यामुळे हा कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Web Title: Tribute to Arun Lad