सांगली : पंचशीलनगर येथील युवकांनी रविवारी परिसरात वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविला. रस्त्याकडेला असलेल्या घरांसमोर वृक्षारोपण करुन त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी संबंधित नागरिकांवर सोपविली.
सामाजिक कार्यकर्ते महालिंग हेगडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेचे नगर अभियंता आप्पा हलकुडे यांच्याहस्ते प्रभाग वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचा संकल्प सलग दुसऱ्या दिवशी सुरू होता. दुसऱ्या दिवशी संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक काकासाहेब पाटील तसेच उपनिरीक्षक महेश डोंगरे, अमर देवमाने, हणमंत कांबळे, नीलेश डोंगरे, विक्रम जाधव आदी पोलीस कर्मचारी तसेच सुनील मोहिते, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग काळे यांच्या हस्ते पंचशीलनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बापूसाहेब कोळेकर, असिफ इनामदार, मयुरेश लोखंडे, संतोष काळे, बाळासाहेब देशमुख, व्यंकटेश गुरव, अनिल ढोबळे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे अधीक्षक विजयकुमार सोनवणे, डॉ. हेर्लेकर, डॉ. नितीन घाटगे, डॉ. शैलजा पवार, डॉ. महेश पवार उपस्थित होते.
चौकट
पन्नासठिकाणी वृक्षारोपण
परिसरात ५० ठिकाणी वृक्षारोपण केले. त्याच्या संगोपनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारली. याचे नियोजन हे बापू कोळेकर, रमेश डफळापुरे, असिफ इनामदार, मयुरेश लोखंडे, सचिन पाटील, शाहरुख इनामदार, लखन इनामदार, आदम कलावंत, प्रकाश जामदार, अनिल ढोबळे, अमोल कोरडे, सागर तांबे, बाळासाहेब देशमुख आदींनी केले.