ढवळीतील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:45+5:302021-07-16T04:19:45+5:30
शिगाव : ढवळी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात थोर विचारवंत प्रा. डॉ. एन. ...

ढवळीतील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम
शिगाव : ढवळी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात थोर विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रशांत नारायण पाटील व संगीता प्रशांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांना आधार देण्यासाठी विशाल पाटील यांनी २१ हजार रुपयांचे परगोले विद्यालयाला भेट दिले. प्रा. डॉ. नामदेव आडनाईक व प्रा. डॉ. सुनील हेळकर यांनी सुगंधित वेली विद्यालयाला भेट दिल्या. शिक्षक एम. डी. जाधव यांनी ग्रीन विद्यालय करण्यासाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. मुख्याध्यापक एन. डी. माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जितेंद्र भोई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.