काळ्या खणीतील झाड विनापरवाना तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:19+5:302021-06-30T04:18:19+5:30
सांगली : शहरातील काळ्या खणीतील एक झाड मंगळवारी तोडण्यात आले. पर्यावरणतज्ज्ञ अजित ऊर्फ पापा पाटील यांच्या निदर्शनास ही बाब ...

काळ्या खणीतील झाड विनापरवाना तोडले
सांगली : शहरातील काळ्या खणीतील एक झाड मंगळवारी तोडण्यात आले. पर्यावरणतज्ज्ञ अजित ऊर्फ पापा पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडेही तक्रार केली. दरम्यान, हे झाड विनापरवाना तोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
काळी खणच्या स्वच्छतेची जबाबदारी खासगी स्वयंसेवी संस्थेकडे आहे. त्यात एका कर्मचाऱ्याने खणीतील झाड मंगळवारी तोडले. त्याला फांद्या तोडण्याची तोंडी परवानगी होती. हे झाड खणीच्या पाण्यात आडवे झाले होते. त्यासाठी ते तोडण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. उद्यान निरीक्षक गिरीश पाठक यांनीही घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, अजित पाटील यांनी याबाबत तक्रार केली आहे. झाड तोडण्याची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. संबंधित कर्मचाऱ्याकडेही परवान्याबाबत विचारले असता त्यानेही नकार दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
चौकट
वृक्ष कमिटीची बैठकच नाही
गेले चार महिने वृक्ष कमिटीची बैठकही घेण्यात आलेली नाही, गत बैठकीत काळी खणीतील झाड तोडण्याचा विषय नव्हता. तरीही विनापरवाना झाड तोडण्यात आले. एकीकडे महापालिकेच्या ऑनलाईन बैठका होत आहेत. मग वृक्ष कमिटीच्या बैठका घेण्यात काय अडचण आहे. झाड तोडणाऱ्यावर उद्यान विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.