चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:46+5:302020-12-09T04:22:46+5:30

सांगली : अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनचालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. अंकुश लालासाहेब आवळे (वय ३७, ...

Transport of illegal liquor in a four-wheeler | चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक

चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक

सांगली : अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनचालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. अंकुश लालासाहेब आवळे (वय ३७, रा. विटा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तासगाव, विटा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना विटा येथून एका सिल्व्हर रंगाच्या चाकचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. हे वाहन तासगावकडे येत असल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने वंजारवाडी (ता. तासगाव) येथे सापळा रचला. पोलिसांनी हे वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्याच्या वाहनाची झडती घेतली असता, देशी दारू ९ बाॅक्स आढळून आले. दारूसाठा व वाहन असे सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवीराज फडणीस, फौजदार अच्युत सूर्यवंशी, मच्छिंद्र बर्डे, सतीश अलदर, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, प्रशांत माळी यांनी केली.

Web Title: Transport of illegal liquor in a four-wheeler