बदली कर्मचारी २० वर्षांपासून कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:28+5:302020-12-09T04:21:28+5:30

सांगली : चतुर्थश्रेणी तसेच कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाने केली आहे. ...

Transfer staff waiting for permanent appointment for 20 years | बदली कर्मचारी २० वर्षांपासून कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

बदली कर्मचारी २० वर्षांपासून कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

सांगली : चतुर्थश्रेणी तसेच कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाने केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. एन. काळे यांनी ही माहिती दिली.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी २० वर्षांपासून लढा सुरु आहे. कायम नेमणुकीच्या प्रतीक्षेत अनेकजण निवृत्त झाले, तर अनेकजण मृतही झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. राज्यात १९ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत दुसऱ्या टप्प्यातील सेवा नियमितीकरणाच्या प्रस्तावात सुमारे ९२५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, त्यात सांगली जिल्ह्यातील ८१ कर्मचारी आहेत. पात्रता असतानाही त्यांना कायम केलेले नाही.

चौकट

व्हनमाने यांनी सांगितले की, शासन या कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण करत आहे. याच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व सांगली शासकीय रुग्णालयातील कर्मचारी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील. दुपारी जेवणाच्या सुटीत हे आंदोलन होईल.

यावेळी संजय सडकर, संजय कांबळे, संदीप सकट, मिलिंद हारगे, मोहन गवळी, प्रकाश घोडके, अन्वर कुरणे आदी उपस्थित होते.

----------

Web Title: Transfer staff waiting for permanent appointment for 20 years