कोकरूड पोलिसांकडून पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST2021-04-14T04:24:59+5:302021-04-14T04:24:59+5:30

कोकरूड : कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर कोकरूड पोलिसांकडून कोकरूडसह परिसरातील गावात पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली. शिराळा पश्चिम भागातील कोकरूड ...

Traffic from Kokrud police | कोकरूड पोलिसांकडून पथसंचलन

कोकरूड पोलिसांकडून पथसंचलन

कोकरूड : कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर कोकरूड पोलिसांकडून कोकरूडसह परिसरातील गावात पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली.

शिराळा पश्चिम भागातील कोकरूड पोलीस ठाणे हद्दीत वाड्यावस्त्यांसह ७७ गावांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, आरळा, मणदूर, या ठिकाणी मोठ्या बाजारपेठा असून, कायम लोकांची वर्दळ असते.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र काही ठिकाणी याचे उल्लंघन होताना दिसत आहे. याच्या पाश्वभूमीवर कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली कोकरूड व आसपासच्या गावात पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली.

Web Title: Traffic from Kokrud police