शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना हवा नाशिक पॅटर्नचा दणका, ..तर फसवणुकीचे धाडस करणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:10 IST

सांगलीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू होताच, व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या बातम्याही येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात तासगाव तालुक्यात ४७ लाखांच्या फसवणुकीची तक्रार झाली आहे. या पार्श्वभूमीवर पैसे वसुलीसाठी सांगलीतही नाशिक पॅटर्न राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकविले होते. द्राक्षे घेऊन गायब झाले होते. शेतकऱ्यांनी पैशांसाठी व्यापाऱ्यांचा पिच्छा पुरवूनही दाद मिळत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे दाखल केल्यास कायदेशीर प्रक्रिया वर्षानुवर्षे चालेल, शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर सुटणार नाही, हे लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी संबंधित व्यापाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावले. पैसे दिले नाहीत, तर गुन्हे दाखल करून पोलिस कोठडी दाखविण्याचा इशारा दिला. यामुळे घाबरलेल्या व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकले. पोलिसांनी कायदा व व्यवहाराची सांगड घालून प्रश्न सोडविला. सांगलीतही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. शेतकऱ्यांनी वर्षभर कष्टाने पिकविलेली द्राक्षे व्यापारी डोळ्यांदेखत घेऊन गायब होतात. शेतकरी त्यांना शोधून त्यांच्या गावापर्यंत पोहोचतात, पण पैसे मिळत नाहीत. नाशिकमध्ये घटले फसवणुकीचे प्रमाण नाशिकच्या पोलिसांनी व्यापाऱ्यांना हिसका दाखविल्याने तेथील फसवणुकीचे प्रमाण कमी आले. शेतकरीही सतर्क झाले. याच नाशिक पॅटर्नची गरज सांगली जिल्ह्यातही आहे. पोलिसांनी वचक निर्माण केल्यास व्यापारी व दलाल फसवणुकीचे धाडस करणार नाहीत अशा प्रतिक्रिया आहेत.नोंदणी होते किती?शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीने दलालांची नोंदणी सक्तीची केली आहे. पण किती नोंदणी होते हा संशोधनाचा विषय आहे. ४० कोटीचा चुनागेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी सुमारे ३० ते ४० कोटींचा चुना लावल्याचा अंदाज आहे.यामुळे होते फसवणूकव्यापाऱ्यांचे पॅन, आधार व ओळखपत्र घेतल्याशिवाय व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिस करतात. फसवणुकीची तक्रार नोंदवून घेताना व्यापाऱ्याशी लेखी करार आहे का? याची विचारणा करतात. पण करारासाठी अडलेल्या शेतकऱ्याची द्राक्षे व्यापारी घेत नाहीत. बागेतून द्राक्षे पाऊसपाण्याचा फटका बसण्यापूर्वीच घालविण्यासाठी धडपडणारा शेतकरी करारमदार करण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे त्याला फसवणुकीचा दणका बसतो. दर पाडण्याचेही कारस्थान केले जाते.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस