शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरणाच्या सांडव्याच्या भिंतीजवळ पर्यटकांचा धिंगाणा, सुरक्षा यंत्रणा कुचकामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:26 IST

धरणाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक पोहोचतातच कसे?

वारणावती : पंधरा दिवसांपूर्वी चांदाेली धरणाच्या सांडव्याजवळील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी चांदोली परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांनी थेट धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत धाव घेतली. आठ ते दहा तरुण धरणाच्या सांडव्याखालील डेड स्टोरेज गेटच्या पाण्यात डुबक्या घेताना दिसून आले. धरणाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक पोहोचतातच कसे? धरण प्रशासनाची सुरक्षा काय करते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.सध्या उन्हाळी सुटी असल्याने चांदोलीला पर्यटकानी पुन्हा गर्दी हाेत होती. त्यातच दोन दिवस सलग सुटी आल्यामुळे पर्यटकांची गर्दी जास्तच हाेती. मात्र चांदोलीच्या पर्यटनाला गालबोट लागण्याचे प्रकार हुल्लडबाज पर्यटकांमुळे वारंवार होत आहेत.काही हुल्लडबाज पर्यटक मद्यप्राशन करून धरणाच्या नियमावलीचा भंग करतात. मागील काही दिवसात या परिसरात आठ पर्यटकांचा मृत्यू हाेऊनही धरणाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. काही हुल्लडबाज पर्यटक धरणाच्या सांडव्याच्या कडेला धरण्याच्या सांडव्यातून गळती होत असलेल्या पाण्यात जाऊन डुबक्या घेताना दिसतात. गतवर्षी चांदोली धरणाची अतिरेकी संघटनेने रेकी केल्याचे समाेर आले हाेते. तरीदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही.वॉटर स्पीड ब्रेकर टँकपासून पाठीमागे अंदाजे शंभर तेे दीडशे मीटर लांब तसेच दोन्ही बाजूने अंदाजे दहा मीटर उंच असणारी भिंत ओलांडून धरणाच्या मुख्य भिंतीजवळ जाणे सहजासहजी शक्य नाही. तरीही पर्यटक असे जीवघेणे धाडस करीत असल्याने धरण प्रशासनाची डाेकेदुखी वाढली आहे.चौकीत रक्षक नाहीमागील एक वर्षापासून धरणाच्या पायथ्याला दक्षिण बाजूस सुरक्षारक्षकांची चौकी बांधण्यात आली आहे. तिचा वापर येथे येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठीच हाेऊ शकताे. शासनाने लाखो रुपयांचा निधी या चौकीसाठी खर्च केला आहे. परंतु अद्याप या चौकीत सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणPoliceपोलिसtourismपर्यटन