मुसळधार पावसात कासव आले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:47+5:302021-06-09T04:34:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील येळापूर येथे शनिवारी धो-धो पाऊस पडत असताना एक कासव चक्क ...

मुसळधार पावसात कासव आले घरी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील येळापूर येथे शनिवारी धो-धो पाऊस पडत असताना एक कासव चक्क एका घरात घुसले. कुटुंबातील महिलेने दार उघडले, तर समोर कासव दिसले. त्याला आत घेऊन रात्रभर सुरक्षित ठेवले. सकाळी विहिरीत सोडण्यात आले.
शनिवारी दुपारी पश्चिम आणि उत्तर भागात मुसळधार पावसाच्या सरी पडल्या. याच जोराच्या पावसात येळापूर येथील निनाई मंदिराजवळ असलेल्या दीपक विष्णू पाटील यांच्या घराच्या दिशेने अंदाजे दीड किलो वजनाचे कासव चालत निघाले होते. पावसामुळे सर्वांच्या घरांचे दरवाजे बंद होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाटील यांच्या पत्नी रेश्मा कामानिमित्त बाहेर आल्या असता कासव दिसले. त्यांना वाटले साप असावा म्हणून त्यांनी कुटुंबातील इतर लोकांना बाहेर बोलावून घेतले. नंतर बॅटरीच्या उजेडात ते कासव असल्याचे समजले. त्यानंतर त्याला घरात ठेवून घेऊन सकाळी गावातील विहिरीत सोडण्यात आले. कासव सापडल्याची माहिती मिळताच सकाळी अनेकांनी पाटील यांच्या घरी पाहण्यासाठी गर्दी केली होती.