शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; एक ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:36 IST

आटपाडीत घरांची पडझड : मिरज तालुक्यात केळीच्या बागांसह अन्य पिकांचे नुकसान

सांगली : वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाच्या पावसाने गुरुवारी जिल्ह्याला झोडपले. विभूतवाडी (ता.आटपाडी) येथे घरावर झाड कोसळून एक ठार तर दोघेजण जखमी झाले. मिरज तालुक्यात केळी व आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले.सांगली जिल्ह्यात सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव नागरिकांनी घेतला. सायंकाळी पाच वाजता सांगली, मिरज शहरासह शिराळा, वाळवा, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात पावसास सुरुवात झाली. तासभर पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले तर दुष्काळी भागात पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला. आटपाडी, तासगाव, मिरज व शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

सांगली, मिरजेत दोन तास हजेरीसांगली व मिरज शहरातही मध्यम स्वरूपाच्या पावसाने दोन तास हजेरी लावली. प्रमुख रस्ते व गुंठेवारी भागात पाणी साचून राहिले. वादळी वाऱ्याने सांगली ते मिरज रस्त्यावर तसेच माधवनगर रस्त्यावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

तुंगला केळीची बाग उद्ध्वस्ततुंग (ता. मिरज) येथे वादळी वाऱ्यामुळे एक एकरातील केळीची बाग कोसळून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आटपाडीत घरांची पडझडआटपाडी तालुक्यातील हिवतड, गोमेवाडी गावातील अनेक घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पत्र्यांचे छत उडून गेले असून, काही घरांची पडझड झाली. झाड अंगावर पडल्याने आटपाडीत एका बैलाचे शिंग मोडले आहे.

कडेगावला हुलकावणी, खानापुरात तुरळककडेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली नाही. खानापूर तालुक्यात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली.

शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडलेशिराळा : शिराळा तालुक्यात वादळी वारे व पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विजेचे २० खांब पडून तारा तुटून ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काळोखेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे १० खांब पडले. तारा तुटलेल्या आहेत. भाटशिरगाव, चिखली, मांगले, आरळा, येथे विचेचे खांब व तारा तुटल्या आहे. यामुळे घरातील व शेतातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. 

दिघंचीत दमदार पावसाची हजेरीदिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे गुरूवारी पाच वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. दिघंचीसह संपूर्ण परिसरात दमदार पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर मान्सूनपूर्व पावसामुळे करपू लागलेला पिकांना दिलासा मिळाला तर काही ठिकाणी उभी पिके भुईसपाट झाली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDeathमृत्यू