अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

By Admin | Updated: October 28, 2016 23:50 IST2016-10-28T23:50:24+5:302016-10-28T23:50:24+5:30

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : जिल्ह्यात ६०६ उमेदवारांचे अर्ज दाखल; आज अंतिम मुदत; आॅफलाईन अर्ज स्वीकारणार

Today the flying flame to fill the application | अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीची चुरस वाढत असून, शुक्रवारी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. जिल्ह्यात दिवसभरात ३७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शुक्रवारअखेर ६०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज, शनिवार शेवटचा दिवस आहे. त्यातच आॅफलाईन अर्ज भरण्याची सवलत मिळाल्याने आज एकच गर्दी उसळणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख शहरांत निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि पलूस या नगरपालिका, तर कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, शिराळा येथील नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आज, शनिवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व असल्याने शुक्रवारी अनेक उमेदवारांनी हाच मुहूर्त साधला. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करताना चुरस दिसून आली.
विटा येथे दिवसभरात ५४ अर्ज, तर तासगाव येथे ६० अर्ज दाखल झाले. या निवडणुकीसाठी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, प्रशासनावरील ताण बऱ्यापैकी कमी झाला असला तरी, उमेदवार आणि पक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. आॅनलाईनच्या फटक्यामुळे खानापूर येथे केवळ पाच उमेदवारी अर्ज शुक्रवारअखेर दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने नगरपरिषद निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, या प्रक्रियेबाबत संभ्रम दिसत होता. परंतु निवडणूक आयोगाने उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारी आॅफलाईन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. शिवाय शनिवारी अंतिम मुदत असल्याने गर्दी उसळणार आहे. (प्रतिनिधी)
शिराळ््यात
बहिष्कार कायम
४पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी शिराळकर नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
४उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला असताना एकही अर्ज दाखल झाला नसल्याने नागरिकांचा बहिष्कार कायम राहण्याची शक्यता आहे.
आज सुटी तरीही...
४आज, शनिवारी नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
४या सुटीदिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याविषयी शंका असतानाच, सुटी असली तरीही आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Web Title: Today the flying flame to fill the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.