आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टरांची आज गुलाबी फीत लावून सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:02+5:302020-12-11T04:54:02+5:30

ते म्हणाले, शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तुटवडा असलेल्या शल्यचिकित्सकांच्या समस्येवर मात करता येणार आहे. ग्रामीण भागात शस्त्रक्रियेसारख्या सेवा उपलब्ध होण्यात ...

Today Ayurvedic, Homeopathy, Unani doctors with pink ribbon service | आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टरांची आज गुलाबी फीत लावून सेवा

आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टरांची आज गुलाबी फीत लावून सेवा

ते म्हणाले, शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तुटवडा असलेल्या शल्यचिकित्सकांच्या समस्येवर मात करता येणार आहे. ग्रामीण भागात शस्त्रक्रियेसारख्या सेवा उपलब्ध होण्यात खूप अडचणी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आवश्यक ते बदल स्वीकारून आयुर्वेद व युनानी डॉक्टर शस्त्रक्रिया यशस्वी करणार आहेत. महाराष्ट्रात कायद्याने आयुर्वेदाच्या पदवीधारकांना ही मिश्र चिकित्सा करण्याचा अधिकार अगोदरच प्राप्त झाला आहे. यामुळे शासनाने आपल्याच सहकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराविरोधात संप, काम बंद आंदोलन, निदर्शने करुन जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. म्हणूनच दि. ११ डिसेंबरच्या आयएमए संघटनेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही. उलट रुग्णांची गैरसोय दूर होण्यासाठी आम्ही गुलाबी फीत लावून रुग्णांना सेवा देणार आहोत, असेही डॉ. बरगाले व डॉ. दिवाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: Today Ayurvedic, Homeopathy, Unani doctors with pink ribbon service