शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावर पाणी विकत घेण्याची वेळ, बॅरेलला १०० रुपये : टँकरचा दर हजार रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:03 IST

सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या

ठळक मुद्देकूपनलिका, विहिरी कोरड्या

जालिंदर शिंदे ।घाटनांद्रे : सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. याठिकाणी खासगी चार पाण्याचे टँकर पाणी विकण्याचे अहोरात्र काम करीत आहेत.

घाटमाथ्यावर दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बॅरेलला १०० रुपये, तर टँकरला हजार रुपये मोजावे लागत आहेत. अगोदरच चालूवर्षी पावसाविना खरीप व रब्बी पेरा वाया गेला असल्याने शेतातील उत्पन्न थांबल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. त्यातच पाणी विकत घ्यावयाचे संकट ओढवले आहे.घाटमाथ्यावरील घाटनांद्रे गावाला गेली कित्येक वर्षे पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र व्यवस्था होती. कूपनलिकेतील पाणी विहिरीत टाकून ते पाईपलाईनद्वारे टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होत होता. परंतु

पाण्याविना गेल्या सहा महिन्यापासून ही व्यवस्था बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी शासनदरबारी धूळ खात पडून आहे. त्यातच सर्वच लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन तात्काळ टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसत आहे. जनावरे व बागा जतन करण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. साधारण माणसाला दिवसाकाठी २० लिटर, मोठ्या जनावरांना ४० लिटर, लहान जनावरांना २० लिटर, तर शेळी-मेंढीला ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्या गावात टँकर सुरु झाले, त्या गावात जनावरांच्या पाण्याचा उल्लेखच नाही.

ना छावणी, ना पाणी, त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षबाग जतन करण्यासाठी एक एकरासाठी २ टँकर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे एका पाण्यासाठी दोन हजार खर्च येत आहे. त्यामुळे चांगलेच पाण्याचे संकट निर्माण झाले असून प्रशासन मात्र भेटी, बैठका व दौºयातच गुंग आहे.गाव, वाडी, वस्तीवर सध्या पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागत आहे. गाव व परिसरात किमान चार टँकर रात्रंदिवस पाणी विकण्याचे काम करीत असून प्रशासन मात्र अभ्यास दौºयावरच अडकले आहे.साधारणत: लागणारे पाणी व येणारा खर्च..प्रति दिन पाणी आवश्यक पाणी सध्या खर्चप्रति माणूस २० लिटर प्रतिदिनमोठे जनावर ४० लिटर प्रतिदिन बॅरेल १०० लहान जनावर २० लिटर प्रतिदिन रुपयेप्रमाणेशेळी/मेंढी ५ लिटर प्रतिदिनएक एकर बागेसाठी २ टँकर पाणी २०००

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई