शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वृक्षसंवर्धनासाठी तीन वर्षांची सुटी खर्ची-शिक्षकाची धडपड : पांडोझरी येथील अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:24 IST

संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे सलग तीन वर्षे सुटीचा वेळ देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन ...

ठळक मुद्देग्रामस्थांचेही लाभले सहकार्य

संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे सलग तीन वर्षे सुटीचा वेळ देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पूर्व भागातील पांडोझरी येथे बाबर वस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेला येणारा कच्चा रस्ता... खडकाळ माळरानावर मराठी पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेत ४९ विद्यार्थी आहेत. शाळेच्या आवारात लिंबू, कडूनिंब, करंजी, चिंच, डोंगरी झाड, नारळ, सीताफळ, गुलमोहर, मोरपंखी, चाफा, अशोक, जास्वंद अशी वेगवेगळी ६९ झाडे लावली आहेत. सध्या उन्हाळी सुटी सुरू आहे. सुटी असतानाही शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग तीन वर्षे सुटीतही विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन झाडांना दररोज सकाळी पाणी देतात. शिक्षकांसोबत चिमुकली मुलेही भर उन्हात पाणी देऊन झाडांचे संवर्धन करीत आहेत.

पांडोझरी येथील दुंडाप्पा कलादगी या टँकरमालकाने एक खेप मोफत पाणी दिले आहे. परिसरात पाणी विक्री तेजीत सुरूअसताना त्यांनी चिमुकल्या मुलांसाठी शाळेला मदत म्हणून पाण्याचा टँकर मोफत दिला आहे. शेतकरी मायाप्पा केरुबा गडदे यांनीही स्वत:ची फळबाग असतानाही महिन्यातून एकदा शेतातील कूपनलिकेचे पाणी शाळेपर्यंत पाईपलाईन करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिलीप वाघमारे केवळ आठ दिवस गावी जाऊन आले. वेगवेगळे उपाय वापरुन झाडे वाचविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. सुटीचा इतर वेळ शाळेसाठी देऊन दररोज सकाळी मुलांसोबत ते झाडांना पाणी देतात. विकास गडदे, अनिल गडदे, नितीन गडदे, हर्षवर्धन मोटे, अधिक मोटे, अस्मिता लोखंडे, वेदिका गडदे, राहुल गडदे, विश्वराज कोरे, शैलेश कोरे, अमीर जमखंडीकर, प्रथमेश बाबर, प्रतीक्षा बाबर, अरविंद कांबळे, काखंडकी अर्जुन, प्रदीप मोटे, अश्विनी गडदे, आरती कोरे, आदिती कोरे, श्रेया वज्रशेट्टी, रुक्मिणी काळे, क्षमा मोटे हे विद्यार्थी आळीपाळीने झाडांना पाणी देतात.शाळा समितीचे पाठबळशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू मोटे व केंद्रप्रमुख रमेश राठोड, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब जगधने, आर. डी. शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, सरपंच जिजाबाई कांबळे, उपसरपंच नामदेव पुजारी, सलिमा मुल्ला यांची साथ आणि पालक मारुती बाबर, तुकाराम कोरे, तुकाराम बाबर, गुलाब गडदे, राजाराम गडदे, प्रकाश बाबर, आप्पासाहेब मोटे, धयाप्पा गडदे, आप्पासाहेब गडदे, माणिक बाबर, नामदेव मोटे-सावंत, गोविंद कोकरे, संतोष बजंत्री, वज्रशेट्टी निंगाप्पा, दत्तात्रय कोरे, संजय गडदे, तानाजी कोकरे, अधिक कोकरे यांचे सहकार्य आहे. 

गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत असल्यामुळे ग्रामीण भाग उजाड होत चालला आहे. ग्रामीण भागात शेतात, घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे, हा उद्देश आहे. झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.- दिलीप वाघमारे, सहशिक्षक

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई