पेठनाका येथून एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:26+5:302021-09-26T04:29:26+5:30
इस्लामपूर : पेठ नाका (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील तिघे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामध्ये ३१ वर्षीय आईसह ...

पेठनाका येथून एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता
इस्लामपूर : पेठ नाका (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील तिघे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामध्ये ३१ वर्षीय आईसह मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. शनिवारी या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली.
जुलेखा रब्बानी मुल्ला (वय ३१), जुबेर रब्बानी मुल्ला (१२) आणि रझिया रब्बानी मुल्ला (७) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पती रब्बानी आयुब मुल्ला यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. हे तिघे १८ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत.
रब्बानी यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. १८ सप्टेंबरला ते दुकानाचा माल आणण्यासाठी सांगलीला गेले होते. तेथून माल खरेदी करून ते दुपारी ३ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांना घराला कुलूप लावलेले दिसले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केल्यावर त्यांची पत्नी जुलेखा ही दोन्ही मुलांना सोबत घेऊन कोणास काही न सांगता निघून गेल्याचे समजले. रब्बानी यांनी त्यानंतर सगळीकडे शोध घेतला मात्र तिघांचाही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे शनिवारी त्यांनी पोलिसात वर्दी दिली.
फोटो : २५ जुलेखा मुल्ला, २५ जुबेर मुल्ला, २५ रझिया मुल्ला