शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या जंगलात बाजीची डरकाळी, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; हालचालींवर वनविभागाचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:45 IST

विकास शहा शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून ...

विकास शहाशिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपला वावर निर्माण करणाऱ्या बाजी या नर वाघाने आता कोयना परिसरात आपले साम्राज्य प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेदरम्यान बाजीचे दर्शन कॅमेरा ट्रॅपमध्ये झाले असून, त्याच्या डरकाळीने संपूर्ण सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला आहे.कोयना भागात बाजीची दहशतसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन नर वाघांचा संचार आहे. यातील सेनापती आणि सुभेदार यांनी चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित केली आहे, तर बाजीने कोयना भागातील भैरवगड ते पाली, मालदेव या पट्ट्यात आपला दरारा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्र गणना फेज १ वेळेस आलेल्या काही स्वयंसेवक यांना कोयना भागात पाली व जुगंटी परिसरात मोठ्या मोठ्याने बाजी वाघाच्या डरकाळ्या ऐकण्यास मिळाल्या.

बाजीची वैशिष्ट्ये :वय : साधारण ३ ते ३.५ वर्षे (पूर्ण वाढ झालेला नर).पंज्याचा ठसा : १६ सेमी x १६ सेमी इतका मोठा आणि रुंद.सध्याची स्थिती : बाजी या परिसरात शिकार करून आपली हद्द टिकवून आहे.

देशभरातील स्वयंसेवकांच्या उपस्थितीत व्याघ्र गणनानुकतेच ''राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण'' आणि ''भारतीय वन्यजीव संस्था'' यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीत ''फेज १'' व्याघ्र गणनेचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते १७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या सर्वेक्षणात केरळ, कर्नाटक, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांतून तब्बल ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेत कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजीचे स्पष्ट फोटो आणि व्हिडीओ कैद झाले आहेत.

पर्यटनाला मिळणार चालनावाघांच्या वाढत्या वावरामुळे सह्याद्रीतील वन पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याचा थेट फायदा स्थानिक युवकांना होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सह्याद्रीचा हा बाजीराव आता आपल्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप असून, वनविभागाकडून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

सह्याद्रीत आता वंशवृद्धीचे वेधसह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघिणींना सह्याद्रीत सोडण्यात आले आहे. आता बाजी, सेनापती आणि सुभेदार या नरांच्या जोडीला मादी वाघिणी उपलब्ध झाल्याने भविष्यात सह्याद्रीत वाघांची संख्या वाढण्याची (वंशवृद्धी) मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baji the Tiger Roars in Koyna Forest, Captured on Camera!

Web Summary : Tiger Baji dominates Koyna, captured on camera during tiger census. This boosts tourism, creates jobs. With new tigresses, Sahyadri anticipates tiger population growth.