शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: मिरजेत साडेतीन लाखांच्या बनावट नाेटा जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:27 IST

या बनावट नोटा कोणाची तरी आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणल्याच्या संशयाने गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरज : मिरजेत कृष्णा घाट येथे मंगळवारी रात्री वीटभट्टीजवळ रात्रीच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारीतून रेक्झिन बॅगेतून आणलेल्या ३ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.‘भारतीय बच्चो का बँक’ असे छापलेल्या नोटांची ५५ बंडले व त्यावर ५०० रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा लावून व दोन हजार रुपयांच्या हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या नोटांचे ४५ बंडल ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जन नालबंद (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी) व शब्बीर साहेबहुसेन पीरजादे (रा. गुरुवार पेठ, मिरज) या तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे.तिघेजण बनावट नोटा घेऊन मिरजेत येत असल्याची माहिती मिळाल्याने गांधी चौक पोलिसांनी सापळा रचला होता. शास्त्री चाैकात मोटार आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून नोटा हस्तगत केल्या. या बनावट नोटा कोणाची तरी आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणल्याच्या संशयाने गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी उमर एकसंबेकर, नदीम नालबंद व शब्बीरसाहेब पीरजादे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडील बनावट नाेटांसह नंबरप्लेट नसलेली मोटार व चार मोबाइल ताब्यात घेतले. याबाबत तिघांवर आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न व मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर