शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा व्हॅली’तून तिघांची हकालपट्टी

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

नव्या निवडी : उपाध्यक्षपदी रमेश आरवाडे; पांडुरंग रूपनर सचिव

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनेचे उपाध्यक्ष डी़ के. चौगुले, सचिव जफर खान आणि संचालक मनोज भोसले यांची संस्थेच्या मासिक सभेत हकालपट्टी करण्यात आली़ संस्थेच्या हिताविरोधात काम केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून, नूतन उपाध्यक्षपदी रमेश आरवाडे यांची, तर सचिवपदी पांडुरंग रूपनर यांची नव्याने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आज सोमवारी पत्रकार बैठकीत दिली़ पाटील म्हणाले की, माझ्या अध्यक्षपदाच्या कालावधित चेंबरची प्रतिमा उंचावेल असेच काम केले आहे़ माथाडीवर तोडगा काढण्यासह उद्योजकांच्या थकित अग्निशमन कराचा मुद्दा निकालात काढला आहे़ त्याच्या रकमा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत़ एमआयडीसीमधील उद्योजकांच्या विविध समस्यांचाही निपटारा करण्यात आला आहे़ रस्ते करणे हा एमआयडीसीचा विषय आहे़ त्यामुळे चेंबरने कोणतेही काम केले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे़ त्यांनी वारंवार संस्थेची बदनामी केल्यामुळेच त्यांना सर्वानुमते काढून टाकण्यात आले आहे़ याबरोबरच नव्याने निवडण्यात आलेले उपाध्यक्ष आरवाडे व सचिव रूपनर यांच्या निवडी कायदेशीर आहेत़ निवडीनंतर आरवाडे व रूपनर म्हणाले की, उद्योजकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देणार आहोत़ यावेळी उद्योजक सतीश मालू, चंद्रकांत पाटील, दीपक मर्दा, अनंत चिमड, रशीद मोमीन, रवींद्र कोंडूस्कर आदी संचालक उपस्थित होते़ (वार्ताहर)