शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:14 IST

जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला

सांगली : मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत आयर्विन पुलावर पाण्याची पातळी पाहण्यास येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी चोप दिला. संशयित अमोल वसंत निकम (वय ४६, रा. शामरावनगर), संदीप दीपक देशमुख (४२, रा. तिसरी गल्ली, रामनगर), धनंजय शैलेश भोसले (२६, रा. गावभाग) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.कृष्णा, वारणेला पूर आला असून कृष्णा इशारा पातळीवरून वाहत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी काही नागरिक गर्दी करत आहेत. पुराच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार शंभर मीटर परिसरात विनाकारण फिरणे, वावरणे, फोटो सेशन, व्हीडिओ बनविणे, रिल्स, सेल्फी आदी बाबींना मनाई केली आहे. तसेच परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास संशयित अमोल निकम, संदीप देशमुख, धनंजय भोसले हे तिघेजण मनाई आदेश असलेल्या आयर्विन पुलाजवळ दारू पिऊन आले. त्यांनी हुल्लडबाजी, दंगा करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर पाणी पाहण्यास आल्याचे उद्धटपणे उत्तर दिले. पोलिसांनी काठीने चोप देऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस कर्मचारी विष्णू बंडगर यांनी तिघांविरूद्ध फिर्याद दिली.

जिल्हाधिकारी यांनी पुराच्या ठिकाणी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यास गर्दी करू नये. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. - संजय मोरे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे.