शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 
2
...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी
3
USA vs PAK : मोठा उलटफेर! अमेरिकेविरूद्धच्या पराभवानंतर बाबरचं मोठं विधान, दिली प्रामाणिक कबुली
4
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
5
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
6
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
7
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
8
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
9
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
10
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
11
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
12
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
13
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
14
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
15
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
16
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
17
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
18
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
19
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
20
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा

इस्लामपुरातील अपहरण प्रकरणातील तिघांना कोठडी :- सुनील कदम याचे निलंबन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:55 PM

शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्दे गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोधपोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत कारवाईचा फास सुनील कदम याच्याभोवती आवळला आहे.

इस्लामपूर : शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ३ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी सलग ३६ तास तपास करत यातील अपहृत मुलाची कोल्हापूर—शिरोली येथून सुखरुप सुटका केली.

वरदराज बाळासाहेब खामकर (रा. अक्षर कॉलनी, दत्तटेकडी इस्लामपूर) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे अपहरण करणाºया टोळीत त्याचा आत्येभाऊ पोलीस शिपाई सुनील मोहन कदम (३२, रा. शिरदवाड, ता. शिरोळ), गोपाल हिराप्पा गडदाकी (२२), विलास बरमा वरई (२0, दोघे रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज) अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना गुरुवारी येथील न्यायालयासमोर उभे केले होते. संशयितांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि दुचाकी हस्तगत करावयाची आहे, तसेच वरदराजचे अपहरण केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आश्रयस्थानाची माहिती घ्यावयाची आहे, तसेच अपहरणाचे कारण निष्पन्न करण्यासाठी सरकार पक्षाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

दि. ३ जून रोजी अत्यंत नाट्यमय पध्दतीने पोलीस असणारा आत्येभाऊ कदम याने वरदराजच्या वडिलांकडून २0 लाखांची खंडणी उकळण्यासाठीच हे अपहरण घडवून आणले. मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत कारवाईचा फास सुनील कदम याच्याभोवती आवळला आहे.निलंबनाची कुºहाडकोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील गडहिंग्लज येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणाºया सुनील कदम याच्यावर निलंबनाची कुºहाड पुन्हा कोसळणार आहे. सलग चार वर्षे सेवेत गैरहजर राहिल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी तो पुन्हा सेवेत आला होता. भोळ्या स्वभावाच्या मामाकडून आर्थिक लाभ उकळण्यासाठी मामेभावाचे अपहरण करण्याचा डाव रचणाºया सुनील कदम याला सलग पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने त्याचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी