सांगली : दसरा व दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेनेकोल्हापूर, मिरज, सांगली मार्गे कटीहारसाठी गाडी क्रमांक ०१४०५ व ०१४०६ सुरू केली आहे. ती १४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी कोल्हापूर येथून सकाळी ९:३५ वाजता सुटेल. कोल्हापूर ते मुंबईसाठी गाडी क्रमांक ०१४१७ व ०१४१८ साप्ताहिक गाडी सोडण्यात आली आहे. ती दर बुधवारी रात्री १० वाजता कोल्हापुरातून सुटेल. २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबरअखेर ती धावणार आहे. गाडी क्रमांक ०१२०९ व ०१२१० ही कोल्हापूर ते कलबुर्गी ही गाडी सकाळच्या सत्रात धावणार आहे. मिरज, पंढरपूर, सोलापूर मार्गे कलबुर्गीला जाईल. २४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर हा तिचा कालावधी आहे. शुक्रवार वगळता, सर्व दिवस सकाळी ६:१० वाजता कोल्हापुरातून सुटेल.
कोल्हापुरातून तीन जादा रेल्वे गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:16 IST