शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतरिक्ष महायात्रा, इस्त्रोचा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:07 IST

सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा ...

सहदेव खोतपुनवत : शिराळा तालुक्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा या विज्ञान विषयक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आलेल्या बसमध्ये ठेवलेल्या विज्ञान विषयक उपकरणांची तालुक्यातील २२ शाळांमधील साडेतीन हजारावर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, मारुती पाटील शास्त्रज्ञ (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती.इस्त्रोच्यामार्फत देशात सर्वत्र अंतरिक्ष महायात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यात विज्ञान विषयक उपकरणांचे प्रदर्शन घडवणारी बस दाखल झाली आहे. शिराळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सदरची बस आलेली होती. यामध्ये इस्त्रोद्वारा निर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती, माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. बाहेरील बाजूस आर्यभट्ट, रोहिणी, भास्कर या उपग्रहांच्या प्रतिकृती आहेत. बसमध्ये आतील भागात भारताने बनवलेल्या विविध प्रक्षेपण यानांच्या प्रतिकृती आहेत. चांद्रयान, मंगळयान, उपग्रहांचं दळणवळण याविषयी माहिती आहे.

तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणीएक दिवसासाठी शिराळा तालुक्यात आलेली ही बस पाहण्यासाठी तालुक्यातील विविध २२ शाळांमधील विद्यार्थी शिराळा येथे गेले होते. सदर बसमधील विज्ञान विषयक उपकरणे यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल शिराळाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात रांगोळी, प्रयोगशाळा साहित्य, विविध रसायने, प्राणी व वनस्पती यांचे नमुने, सुसज्ज ग्रंथालय, विश्वकोश, विज्ञान विषयक पुस्तके आदी बाबी पाहण्याची संधी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली.

अंतरिक्ष महायात्रा या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अंतराळात उपग्रह कसे काम करतात याची सखोल माहिती मिळाली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या मनात रुजण्यास मदत झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही वैज्ञानिक सहल होती. - संजय पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थी