शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:53 PM

सांगली जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देतब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित आठ वर्षे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

उर्वरित ६४९० शेती पंपांच्या जोडण्या केवळ ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या चार ठेकेदारांना ठेका रद्दच्या नोटिसा पाठविल्या आहेत.विहिरी, विंधनविहिरी खुदाई करून पाणी लागल्यानंतर शेतकऱ्यांनी रितसर पैसे भरून अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०१२ ते २०१९ या वर्षातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. १०,२३९ शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यांपैकी महावितरण कंपनीने जिल्ह्यातील दि. ३१ मार्च २०१८ अखेरच्या प्रलंबित ८५९६ वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस) १९८ कोटी रुपयांच्या ५६ निविदा मागविल्या होत्या.

त्यापैकी २६ निविदांना प्रतिसाद मिळाल्यामुळे १०६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ठेकेदारांना कामे सुरु करण्याचे लेखी आदेश दिले. पण ठेकेदारांकडून कामे सुरु करण्यास अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.

मागील दीड वर्षात केवळ दोन हजार १०६ वीज जोडण्यांचीच कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.शेतकऱ्यांचा वीज जोडणीसाठी दबाव वाढल्यामुळे सध्या महावितरणने जिल्ह्यात काम करणाऱ्या चार ठेकेदारांना, कामे वेळेत पूर्ण न केल्याने ठेका रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना ठेकेदारांनी वेळेत उत्तरही पाठविले नाही. दि. ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या जोडण्या प्रलंबित असतानाच सध्या २०१८-१९ या वर्षात ९०२ आणि २०१९-२० या वर्षात ९७४ शेतकऱ्यांनी जोडणीसाठी पैसे भरुन अर्ज केले आहेत.

सध्या महावितरणकडे १०,२३९ जोडण्या प्रलंबित आहेत. एप्रिल २०१२ मध्ये २६७ आणि २०१२-१३ या वर्षात ६१६ शेतकऱ्यांनी अर्ज करुनही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. आठ वर्षे हे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असून त्यांना महावितरणकडून न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर खासदार, आमदारही गप्प असल्यामुळे वीज जोडणी वेळेत मिळेल का, या चिंतेत शेतकरी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली