शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Sangli: बेदाण्याची चोरटी आयात.. उत्पादकांचा पाय खोलात; यंदाच्या हंगामात उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:35 IST

यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले. मात्र..

दत्ता पाटीलतासगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले. त्यामुळे यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड निर्माण केले. मात्र, उच्चांकी दराला बेकायदा चिनी आयातीचा फटका बसला. उत्पादन घटले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या दराचे गणित मात्र विस्कटलेले आहे. अपेक्षेपेक्षा प्रति किलोला शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाली.केंद्र आणि राज्य शासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. बेदाणा उत्पादनात यंदा सरासरीपेक्षा मोठी घट झाली. नवीन बेदाण्याची आयात झाल्यानंतर, बाजारात यंदा बेदाणा दराने इतिहास निर्माण केला. उच्चांकी प्रति किलोला ८८८ रुपये इतका दर मिळवला. बेदाण्याला प्रति किलोस सरासरी ४०० ते ६०० रुपयापर्यंत दर मिळू लागला. मात्र, जून अखेरीस चीनमधून चोरट्या मार्गाने बेदाण्याची आयात सुरू झाली. कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा बाजारात सहजपणे उपलब्ध होऊ लागला. परिणामी बेदाण्याचा सरासरी दर ३०० ते ४०० रुपयांवर येऊन ठेपला.उत्पादन कमी असताना देखील शेतकऱ्यांना प्रति किलोला दीडशे ते दोनशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.

५२ हजार टन शिल्लक बेदाणातासगाव, सांगली, पंढरपूर, सोलापूर, पिंपळगाव, विजापूर या ठिकाणी एकूण १५४ कोल्ड स्टोअरेज आहेत. या कोल्ड स्टोअरेजची एकूण साठवणूक क्षमता २ लाख ९३ हजार ९० टन इतकी आहे. गेल्या वर्षी जुलै अखेर तब्बल एक लाख टन बेदाणा शिल्लक होता. यंदा जुलै अखेर केवळ ५२ हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

उत्पादनात ९१ हजार टनांची घट 

  • २०२४-२५ या वर्षात राज्यात २ लाख ४६ हजार ६०० टन इतके बेदाण्याचे उत्पन्न झाले होते. तर, २०२५-२६ मध्ये १ लाख ५४ हजार ८७० टन इतके उत्पन्न उत्पादन झाले.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ९१ हजार ७३० टनाची घट झाली आहे.

चिनी बेदाणा सहज बाजारातपंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिला असला, तरी आयातदाराकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे. चोरट्या मार्गाने कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा राजरोसपणे भारतात आयात होत आहे. याबाबत कारवाईची मागणी करून देखील केंद्राने राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. चोरटी आयात थांबवून बेस रेटनुसार आयात कर लागू करावा, अशी आमची मागणी आहे. चोरट्या आयातीला वेळीच लगाम घातला नाही, तर दोन हजार कोटींचे परकीय चलन मिळवून देणारी आणि सुमारे ६० लाख लोकांना रोजगार देणारी द्राक्ष इंडस्ट्री संपुष्टात येण्याचा धोका आहे. अशी माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिली.

आयात कर चुकवून भारतात बेदाणा आयात होत आहे. नेपाळ मार्गे चोरट्या पद्धतीने आयात होत आहे. त्याला केंद्र शासनाने तत्काळ लगाम घालावा. आयात होणाऱ्या बेदाण्याचा उत्पादनावर आधारित बेस रेट निश्चित करून कर आकारणी करावी, अन्यथा द्राक्ष बागायतदारांना भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. - सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी.