शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तेरा वर्षांची विद्यार्थिनी अत्याचारातून गर्भवती, संशयित अटकेत; तासगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:49 IST

अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना

तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तिच्या आजीने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तासगाव पोलिसांनी संशयित पांडुरंग सोमलिंग कोळी (वय २७, सध्या रा. बिरणवाडी) यास अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव तालुक्यातील एका गावात सोलापूर जिल्ह्यातील एक कुटुंब रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे. या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी आठवीत शिकत आहे. सोलापूर जिल्ह्यातून रोजगारानिमित्त आलेला पांडुरंग कोळी हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. पीडितेशी त्याची ओळख झाली होती. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन पांडुरंग याने तिला लग्नाचे आमिष दाखवले.त्याने मे ते जून २०२४ रोजीच्या काळात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत कोणालाही माहिती द्यायची नाही, असे केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, तसेच स्वतःचे बरे वाईट करून घेईन, असे धमकावले. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. नुकतेच पीडिता मुलगी गर्भवती राहिल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांना धक्का बसला.पीडितेच्या आजीने तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले. पांडुरंग याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एन), ५०६, तसेच ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग कोळी याला अटक करून गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक अविनाश घोरपडे तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस