शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: माडग्याळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, आठवड्यात सात लाखांचे डाळिंब लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:00 IST

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

दरीबडची : माडग्याळ (ता.जत) येथे शेतात आठवडाभरात सात लाखांची डाळिंब चोरट्यांनी लंपास केली. शेतातील डाळिंबाची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकरी रात्री बागेत पहारा देत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा  बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.पूर्व भागातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची मृग बहर धरला आहे. सध्या डाळिंब परिपक्व झाले आहेत. शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना विहीर, कुपनलिकेला असणाऱ्या पाण्यावर डाळिंब बहर धरला आहे. सध्या डाळिंबाला बाजारात चांगला दर आहे. यातच चोरट्यांनी डाळिंब लंपास केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पांडुरंग सावंत यांचा दीड ते दोन टन माल (२ लाख रुपये किंमत), दत्तात्रय सावंत यांचा एक टन माल (दीड लाख रुपये), उमेश सावंत यांची ५०० किलो (५० हजार रुपये), भानुदास सावंत यांची ७०० किलो (७५ हजारांची), संतोष सावंत यांची एक टन (एक लाख रुपये), मल्लिकार्जुन सोलापुरे यांची एक टन (दीड लाख रुपये) असे एकूण सात लाख रुपयांची डाळिंब चोरी झाली.एका शेतकऱ्यास मारहाणसंतोष सावंत हा रात्री कृषी मोटार सुरु करण्यासाठी गेले होते. यावेळी चोरांनी त्यांना बेदम मारहाण केली व पसार झाले.  पोलिसांनी तपास करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत व सीताराम माळी यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीtheftचोरी