शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकरमध्ये दागिने ठेवायला गेले, ४० तोळे सोन्याची बॅग घेवून चोरटे धूम स्टाईल पळाले; सांगलीत भरदिवसा घडली घटना

By घनशाम नवाथे | Updated: May 2, 2025 13:19 IST

सांगली : शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती ...

सांगली : शहरातील गजबजलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लाॅकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या धनचंद्र भाऊराव सकळे (वय ६५, रा. क्रांती क्लिनिकजवळ, सांगली) यांची तब्बल ४० तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूमस्टाईल लांबविली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.सकळे हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत. कर्मवीर पतसंस्थेत ते खातेदार आहेत. संस्थेत त्यांनी दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी लाॅकर घेतला आहे. चार दिवसापूर्वी लग्नकार्यामुळे त्यांनी दागिने घरात आणले होते. त्यानंतर दागिने परत पतसंस्थेत ठेवण्यासाठी चालकाला घेऊन ते शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीतून बाहेर पडले. कर्मवीर पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबविली. मोटारीचा दरवाजा उघडून सकळे खाली उतरले. तेवढ्यात मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो दुचाकीवरुन चौकातून शंभरफुटी रस्त्याकडे वेगाने निघाला. सकळे यांना क्षणभर काही समजले नाही. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले. भरदिवसा ४० तोळ्याची बॅग लंपास केल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला.चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पतसंस्थेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तपासणी केली. तेव्हा एकट्याच चोरट्याने मोटारीच्या मागून येऊन बॅग लंपास केल्याचे दिसून आले. चोरट्याचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देखील घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस