कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:11+5:302020-12-05T05:07:11+5:30

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुुरु आहे. यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. हतबल पोलीस, शिरजोर चोर ...

Thieves in Kavthemahankal taluka; | कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ;

कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ;

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुुरु आहे. यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. हतबल पोलीस, शिरजोर चोर अशी अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाची महामारी थोडी मंदावली आहे. त्यामुळे हळूहळू महाविद्यालये, शाळा सुरू होत आहेत. आठवडा बाजारही सुरू झाले आहेत. गर्दीचा फायदा घेत महाविद्यालयीन परिसरात, बाजारात मोबाईल चोरट्यांनीही धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात चोरट्यांनी नुकताच नागज व बोरगाव येथून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड अशा दहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. अद्याप या चोरीचा मागमूसही लागला नाही. या दोन गावातील चोऱ्या उघडकीस आणणे हे कवठेमहांकाळ पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

बोरगाव येथे एका शेतकऱ्याचे घर फोडून तिजोरीतून सहा तोळे सोन्याचे दागिने, रोख १७ हजार असा सव्वातीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. नागज येथे एका प्रवासी बसमधील चांदीचे दागिने, भांडी, मूर्ती असा सुमारे चार ते पाच लाखाचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. चोरट्यांचा वाढलेला धुमाकूळ कवठेमहांकाळ पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. या चोरट्यांचा शोध कवठेमहांकाळ पोलीस घेणार का? असा संतप्त सवाल कवठेमहांकाळची जनता करू लागली आहे.

चौकट

महिलांमध्ये दहशत

चोरट्यांची धास्ती महिलांनी घेतली असून, रात्रीच्या वेळी महिला घराचा दरवाजा बंद असला तरी, भीतीच्या छायेखाली राहत आहेत. याचा विचार कवठेमहांकाळ पोलीस करणार का? असा सवालही जनता करू लागली आहे.

Web Title: Thieves in Kavthemahankal taluka;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.